रोबोटिक तंत्रज्ञानामुळे कर्करोग उपचारात रुग्णांसाठी आणि शल्यचिकित्सकांसाठी अधिक सुलभता आली आहे, असे मत एस. हॉस्पिटलचे अध्यक्ष व ज्येष्ठ मूत्ररोगतज्ञ डॉ. सुरेश पाटणकर यांनी व्यक्त केले. जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने त्यांनी याबाबत माहिती दिली. “कर्करोगाबाबत जागरूकता वाढत असली, तरी निमशहरी आणि ग्रामीण भागात आणखी काम करण्याची गरज,” असेही ते म्हणाले. “कर्करोग उपचार हे कोणता कर्करोग झाला आहे आणि कोणत्या टप्प्यात आहे, यावर अवलंबून असतात आणि दीर्घकाळ चालू राहतात.
त्यामुळे याच्याशी लढण्यासाठी जिद्द आणि संयम राखणे महत्त्वाचे ठरते,” असे डॉ. पाटणकर यांनी सांगितल. या आजारावरील उपचाराच्या सुलभतेवर आणि तंत्रज्ञानाबाबत माहिती देताना त्यांनी “कर्करोग उपचारामध्ये नवीन तंत्रज्ञान परिवर्तन घडवून आणत आहे,” असे सांगितले. “रोबोटिक तंत्रज्ञानामुळे अधिक अचूकता साध्य होते. डॉक्टरांना रोबोटिक प्रणालीच्या साहाय्याने बाधित भागावर लक्ष केंद्रित करता येते व आजूबाजूच्या पेशींना किंवा अवयवांना इजा किंवा नुकसान होण्याची शक्यता कमीत कमी असते,” असेही त्यांनी सांगितले.
दरवर्षी दि. ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोगाच्या विविध पैलूंबाबत जागरूकता केली जाते.
यावर्षीची संकल्पना ‘युनायटेड बाय युनिक’ ही आहे. डॉ. आशिष पोखरकर पुढे म्हणाले की, “भारतामध्ये स्तनाचा कर्करोग, फुप्फुस, आतड्यांचा कर्करोग, मौखिक कर्करोग हे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. पुरुषांमध्ये मौखिक, घसा, फुप्फुस आणि मूत्रपिंडाशी निगडित कर्करोग, तर महिलांमध्ये स्तन, गर्भाशय, मौखिक आणि फुप्फुसाच्या कर्करोगामध्ये वाढ होताना दिसत आहे. या सर्व कर्करोगांची जोखीम कमी करायची असेल, तर आपल्या स्वतःशी निगडित जोखमीच्या घटकांबाबत (चुकीची जीवनशैली, तंबाखू इत्यादी) जागरूक असणे महत्त्वाचे आहे. तरच आपण त्यात दुरुस्ती करू शकू व स्वतःच्या आरोग्यामध्ये सुधार आणू शकू.
कर्करोगाची जोखीम कमी करण्यासाठी नियमित तपासणी आवश्यक
कर्करोग जरी टाळता येत नसले तरी जोखीम कमी करण्यासाठी चांगली जीवनशैली, प्रतिबंधात्मक उपाय आणि नियमित तपासणी ही त्रिसूत्री महत्त्वाची असल्याचे मत नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर येथील कर्करोग तज्ज्ञ डॉ. आशिष पोखरकर यांनी व्यक्त केले.
डॉ. आशिष पोखरकर म्हणाले, प्रत्येक रुग्णाच्या वैद्यकीय गरजा या वेगळ्या असतात. कोणत्या प्रकारचा कर्करोग झाला आहे, कुठल्या टप्प्यात आहे, रूग्णाची वैद्यकीय परिस्थिती, सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी अशा अनेक बाबी असतात, ज्यावर वैयक्तिकृत उपचार देणे महत्त्वाचे असते. त्यामुळे आजार केंद्रित दृष्टीकोनापेक्षा रुग्णकेंद्रित दृष्टीकोन हा महत्त्वाचा ठरतो. यामध्ये रूग्ण, डॉक्टर आणि उपचाराच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सर्व सहभागी व्यक्तींची भूमिका ही मोलाची असते. आणि या सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांचे महत्त्व यावर्षीच्या संकल्पनेमध्ये प्रतिबिंबित होते.
कर्करोगाची जोखीम कमी करण्यासाठी चांगली जीवनशैली, प्रतिबंधात्मक उपाय आणि नियमित तपासणी ही त्रिसूत्री
सर्व प्रकारचे कर्करोग जरी टाळता येत नसतील तरी जोखीम कमी करण्यासाठी चांगली जीवनशैली, प्रतिबंधात्मक उपाय आणि नियमित तपासणी ही त्रिसूत्री महत्त्वाची असल्याचे मत नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर येथील कर्करोग तज्ञ डॉ. आशिष पोखरकर यांनी व्यक्त केले.
डॉ. पोखरकर पुढे म्हणाले की, भारतामध्ये स्तनाचा कर्करोग, फुफ्फुस, आतड्यांचा कर्करोग, मौखिक कर्करोग हे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. विशेष करून जीवनशैलीशी निगडीत कर्करोगांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तंबाखू, महासेवन, बैठी जीवनशैली, चुकीचा आहार, प्रक्रिया झालेल्या पदार्थांचे अतिसेवन व प्रदूषण हे अशा कर्करोगांची जोखीम वाढवत आहेत. पुरुषांमध्ये मौखिक, घसा, फुप्फुस आणि मुत्रपिंडाशी निगडीत कर्करोग तर महिलांमध्ये स्तन, गर्भाशय, मौखिक आणि फुप्फुसाच्या कर्करोगामध्ये वाढ होताना दिसत आहे. या सर्व कर्करोगांची जोखीम कमी करायची असेल तर आपल्या स्वतःशी निगडित जोखमीच्या घटकांबाबत (चुकीची जीवनशैली, तंबाखू इत्यादी) जागरूक असणे महत्त्वाचे आहे, तरच आपण त्यात दुरूस्ती करू शकू व स्वतःच्या आरोग्यामध्ये सुधार आणू शकू.
कर्करोगावरील उपचारांमध्ये तंत्रज्ञानामुळे अधिक अचूकता
कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण दिवसगणिक वाढत असतानाच वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे उपचारांमध्ये अचूकता आली आहे. रेडिएशन, केमोथेरपी, इम्युनोथेरपी, कॉस्मेटिक सर्जरी, सायबर नाइफ, रोबोटिक सर्जरी अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ रुग्णांना होत आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले, तंत्रज्ञानामुळे उपचारांमध्ये अचूकता आली आहे. मात्र, कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याने या विषयी जनजागृती करणे आवश्यक असल्याचा सल्लाही जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोगतज्ज्ञांनी दिला.
रोबोटिक तंत्रज्ञानामुळे कर्करोग रुग्णावरील उपचारांत आणि शल्यचिकित्सकांसाठी अधिक सुलभता आली आहे. रोबोटिक प्रणालीच्या मदतीने गाठीवर लक्ष केंद्रित करता येते. यामुळे आजूबाजूच्या पेशींना किंवा अवयवांना इजा किंवा नुकसान होण्याची शक्यता कमी होते. कमी रक्तसाव आणि अचूकतेमुळे रुग्ण लवकर बरा होऊन घरी जाऊ शकतो,
रुग्णांबरोबरच शल्य चिकित्सकांसाठीदेखील ही प्रणाली उपयुक्त ठरते आहे. निमशहरी आणि ग्रामीण भागांत जनजागृती करण्याची गरज आहे. असे ज्येष्ठ मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. सुरेश पाटणकर यांनी सांगितले.
‘प्रत्येक रुग्णाच्या वैद्यकीय गरजा वेगळ्या असतात. कोणत्या प्रकारचा कर्करोग झाला आहे, तो कुठल्या टप्प्यात आहे, रुग्णाची प्रकृती, सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी अशा अनेक बाबी असतात. त्यामुळे आजारकेंद्रित दृष्टिकोनापेक्षा रुग्णकेंद्रित दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. भारतामध्ये स्तनांचा, फुप्फुसांचा, आतड्यांचा, तोंडाचा या कर्करोगांचे रुग्ण वाढत आहेत. पुरुषांमध्ये तोंड, घसा, फुप्फुस आणि मूत्रपिंडाशी निगडीत कर्करोग, तर महिलांमध्ये स्तन, गर्भाशय, तोंडाचा आणि फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. कर्करोगाला दूर ठेवण्यासाठी योग्य जीवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे,’ असे कर्करोगतज्ज्ञ डॉ. आशिष पोखरकर यांनी सांगितले. कर्करोगतज्ज्ञ डॉ. लखन कश्यप म्हणाले, ‘भारतात अंडाशयाचा कर्करोग सुमारे सहा टक्के महिलांमध्ये आढळतो. हा कर्करोग अंडाशयाच्या बाहेरील आवरणातून उद्भवतो. अनेक रुग्णांमध्ये उशिरा निदान होते. उशिरा निदान झाल्यास अंडाशय, फैलोपियन ट्यूब आणि गर्भाशयाच्या पलीकडे पोटातील अन्य अवयव आणि ओटीपोटाच्या आतील आवरणापर्यंत (पेरिटोनियम) पसरलेला असतो. सायटो-रिडक्टिव्ह शस्त्रक्रिया करून ओटीपोटातील कर्करोगग्रस्त भाग काढला जातो.’