हल्ली तरुण पिढीत रोजच्या पोळी भाजी पेक्षा पिझ्झा, बर्गर, शीतपेये, केक ह्याचीच आवड जास्त दिसते. त्यांचे राहणीमान, जीवन शैली, नित्यनेमाने होणाऱ्या पार्ट्या, रात्रीचे जागरण,धूम्रपान मद्यपान , अन् तासन् तास बैठे काम ह्या सर्वांचा परिणाम त्यांच्या शरीरावर दिसून येत आहे.
व्यायामाचा अभाव आणि अवेळी खाण्याच्या सवयीमुळे पचन संस्थेवर वर येणारा ताण आणि त्यातूनच सुरू होणारी बद्धकोष्ठता (Constipation) आणि पोटदुखी . आणि जेव्हा पोटदुखी वारंवार होत असेल तर मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेणे हितावह ठरते कारण मोठ्या आतड्यात जेव्हा जळजळ होऊ लागते तेव्हा कोलन कॅन्सरची(Colon cancer) शक्यता वाढते.
आतड्यात होणाऱ्या गाठी ने ह्या आजाराची सुरुवात होते. कधी कधी पोटदुखी कडे दुर्लक्ष केले जाते.किंवा तात्पुरते संप्रेरके(Hormones) घेवून कमी केली जाते. त्यामुळेही हा आजार समजत नाही.
कोलन कॅन्सरचे(Colon cancer) दोन प्रकार आहेत.त्यात एक डाव्या बाजूला होणारा व दुसरा उजव्या बाजूला होणारा. डाव्या बाजूच्या कर्करोगात पोटदुखी आणि गुदशायात रक्त येते. आणि उजव्या बाजूच्या कर्करोगात उलट्या व थकवा येतो.काही तज्ज्ञांच्या मते हा आजार आनुवंशिक ही असु शकतो.
ह्या आजाराची सुरुवात आतड्यात होणाऱ्या जळजळीने होते. अशा व्यक्तीला बधकोष्टेची(Constipation) समस्या वारंवार सतावत असते.जर लवकर निदान झाले तर रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो.
कोलन कॅन्सरची लक्षणे:-(Symptoms of colon cancer In Marathi)
1) वारंवार पोटात होणारी जळजळ
2) शौचामधून रक्त जाणे
3) बद्धकोष्ठता
4) पोटदुखी
5) अशक्तपणा जाणवणे
कोलन कॅन्सरची कारणे :-(Causes of colon cancer In Marathi)
ह्या आजाराचे मूळ आपण घेत असलेल्या आहारात आहे. हल्ली जंक फूडचा जमाना आहे. त्यात वापरण्यात येत असलेला मैदा, पदार्थ टिकवण्यासाठी वापरण्यात येणारी प्रतिजैविके, कृत्रिम रंग(Artificial colors), साखर हे तब्येतीसाठी अतिशय घातक आहे. अति मीठ अती मसाले सुद्धा आतड्यांना हानी पोहोचवतात.
आहारातून जास्तीत जास्त व्हिटॅमिन कशी मिळतील ह्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.हिरव्या पालेभाज्या ,फळभाज्या, कडधान्ये, तंतुमय पदार्थ ,प्रथिन युक्त पदार्थांचा समावेश आपल्या रोजच्या जेवणात असायलाच पाहिजे. मद्यपान धूम्रपान हि टाळले पाहिजे. अहारासोबत विहाराकडेही लक्ष दिले पाहिजे. म्हणजेच योग्य तो व्यायाम , चालणे , धावणे ,पोहणे ह्याची ही जोड द्यायला पाहिजे. मग कलोन कॅन्सरच काय कोणताच आजार होणार नाही!
डॉ. आशिष पोखरकर हे पुण्यातील कॅन्सर तज्ज्ञ (Oncologist)आणि कॅन्सर सर्जन(Cancer Surgeon) आहेत. त्यांनी बी.जे. मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल, पुणे येथून पदवी पूर्ण केली. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, त्यांनी कर्करोग शस्त्रक्रियेतील सुपर स्पेशलायझेशन पूर्ण केले. मुंबईतील प्रख्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटल, येथून एमसीएच पदवी प्राप्त केली. एमसीएच उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून मिनिमली इनवेसिव्ह आणि रोबोटिक ऑन्को सर्जरीमध्ये फेलोशिपसाठी निवड झाली. सध्या ते मेडी पॉइंट हॉस्पिटल, औंध येथे सल्लागार सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून काम करतात. तसेच त्यांचे मोशी,पुणे स्वतःचे प्रथमेश कॅन्सर क्लिनिक देखील आहे.
ते काही सर्जनांपैकी एक आहेत जे जटिल लॅपरोस्कोपिक आणि रोबोटिक शस्त्रक्रिया करतात. तसेच कर्करोगाच्या रुग्णांबद्दलच्या त्यांच्या सहानुभूतीपूर्ण वागणुकीमुळे रुग्णांना बरे व्हायचा विश्वास देतात.