आपण अनेक प्रकारच्या कर्करोगाबद्दल(Cancer) ऐकतो त्यापैकी एक आहे तोंडाचा कर्करोग(Oral cancer). हा प्रामुख्याने ओठ, जीभ, हिरड्या, गालाच्या आतील बाजुस होतो. तंबाखु, सुपारी, मद्यप्राशन या सवयींमुळे भारतामध्ये या रोगाचे सर्वात जास्त रुग्ण आढळतात.
तोंडाच्या कॅन्सरची १० लक्षणे –(Symptoms of Oral Cancer In Marathi)
कर्करोगाची(Cancer) सुरवात तोंडाच्या आतल्या बाजूला सफेद फोड येण्यापासून होते. जर तोंडात बराच काळ पांढरा दाग, जखम, तोंड आलं असेल, तर तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. याशिवाय खालील प्रमुख लक्षणे दिसून येतात.
१. तोडात फोड येणे – जर तोंडामध्ये अथवा घशामध्ये लाल अथवा पांढ-या रंगाचे जाड व त्रासदायक चट्टे किंवा फोड असतील. आणि दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ झाला तरी ते बरे होत नसतील तर ते तोंडाच्या कॅन्सरचे प्रमुख लक्षण असू शकते.
२. दात सैल पडणे, तोंडातून दुर्गंध येणे – हिरड्या(Gums) दुखावल्या गेल्यामुळे दात तुटणे व दुर्गंध येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. काही रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळून येतात.
३. हिरड्या(Gums) मोठ्या किंवा जाड होणे – कॅन्सरमुळे ओठ व हिरड्यांच्या(Gums) पृष्ठभागावर दुखापत होते ज्यामुळे त्या भागातील टिश्यूज नष्ट होतात.
४. तोंडातून रक्तस्राव होणे – तोंडाच्या आतील भागात रक्तस्त्राव आणि बधीरपणा येणे हे देखील तोंडाच्या कर्करोगाचे(Oral cancer) लक्षण आहे.
५. घशात जळजळ होणे, आवाज बसणे – बोलायला त्रास होतो,सारखी आग होते . बोलणे अवघड होते
६. अशक्तपणा, वजन कमी होणे – अनेक प्रकारच्या कॅन्सरमध्ये हे सामान्य लक्षण आढळते.ओरल कॅन्सरमध्ये अन्न गिळताना त्रास होत असल्यामुळे त्या रुग्णाचे वजन कमी होते. तेव्हा फक्त पातळ अन्न खाणे शक्य होते
७. तोंड उघण्यास त्रास होणे तसेच बोलताना किंवा अन्न गिळताना आणि चावताना त्रास होणे.
८. तोंडाच्या इतर भागात सुन्नपणा येणे.
९. जबड्यात सुज येणे
१०. कानात वेदना होणे- कानात दुखते किंवा वेदना जाणवतात. या वेदना जास्त काळापर्यंत होतात.
तोंडाच्या कॅन्सरवरील उपचार –
लक्षणांच्या आधारे प्रथम बायोस्पी व इतर चाचण्यांद्वारे कॅन्सरचे निदान निश्चित केले जाते. त्यानंतर सिटी स्कॅन किंवा MRI द्वारे त्याची स्टेज आणि आकार किती आहे हे समजते. कर्करोगाचे(Cancer) निदान अगदी पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये झाले तर शस्त्रक्रिया करुन बाधित भाग काढुन कॅन्सरपासुन वाचवू शकतो. वरीलपैकी कोणतीही लक्षणे थोडी जरी जाणवली तर जराही वेळ न दवडता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
डॉ. आशिष पोखरकर हे पुण्यातील कॅन्सर तज्ज्ञ आणि कॅन्सर सर्जन आहेत. त्यांनी बी.जे. मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल, पुणे येथून पदवी पूर्ण केली. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, त्यांनी कर्करोग शस्त्रक्रियेतील सुपर स्पेशलायझेशन पूर्ण केले. मुंबईतील प्रख्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटल, येथून एमसीएच पदवी प्राप्त केली. एमसीएच उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून मिनिमली इनवेसिव्ह आणि रोबोटिक ऑन्को सर्जरीमध्ये फेलोशिपसाठी निवड झाली. सध्या ते मेडी पॉइंट हॉस्पिटल, औंध येथे सल्लागार सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून काम करतात. तसेच त्यांचे मोशी,पुणे स्वतःचे प्रथमेश कॅन्सर क्लिनिक देखील आहे.