कर्करोग
कर्करोग हा शब्द जरी ऐकला की भीतीने गाळण उडते. इतके वेगवगळे प्रकारचे कर्करोग असतात की अनेकांना माहितीही नसते. म्हणूनच काही गोष्टी माहिती असल्यास भीती न बाळगता उपचार घेणे योग्य ठरते. डोकं आणि मानेचा कर्करोग हा एक कर्करोगाचा प्रकार आहे. जगभरात डोके आणि मानेच्या कॅन्सरची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अमेरिकेतील संशोधकांनी एका संशोधनाद्वारे हा खुलासा केला आहे. त्यानुसार, गेल्या वीस वर्षांत तरुण आणि किशोरवयीन मुलांमध्ये डोके आणि मानेच्या कर्करोगाच्या संख्येत 51% वाढ झाली आहे. भारतातही दरवर्षी या कर्करोगाचे १२ लाख नवीन रुग्ण आढळतात.
वयाच्या 50 वर्षांनंतर डोके आणि मानेच्या कर्करोगाची प्रकरणे स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त दिसतात. सहसा या प्रकारच्या कर्करोगाचे मुख्य कारण तंबाखू आणि अल्कोहोलचे सेवन असते.
डोकं व मानेच्या कर्करोगाचे प्रकार
डोक्याच्या व मानेच्या कर्करोगातील सर्व प्रकारांना “कार्सिनोमा” या नावाने ओळखले जाते. डोक्याचे व मानेचे कार्सिनोमा तोंड, नाक, घसा किंवा कान यांच्या त्वचेतील अस्तरातून लाइनिंग किंवा जीमेच्या आच्छादित आवरणाच्या पेशींपासून निर्माण होतात.परंतु, डोक्याचे व मानेचे कर्करोग हे अन्य प्रकारच्या पेशींपासून सुद्धा निर्माण होऊ शकतात.
डोके व मानेच्या कर्करोगाची लक्षणे
- तोंड , घसा व नाकातून होणारा रक्तस्राव . हा रक्तस्राव खूप मोठ्या प्रमाणात नसला तरीही थुंकी किंवा लाळेत रक्ताचे थेंब आढळणे.
- वारंवार कफ आणि खोकला होणे. औषधोपचाराने बरा न होणे.
- आवाजात बदल होणे तसेच स्वरांमध्ये बदल जाणवणे. उपचार केल्यावरही त्यात काहीही बदल न होणे.
- काही जणामध्ये तोंडातून दुर्गंध आणि दात खिळखिळे होणे, तुटणे असेही दिसते.
- कान दुखणे किंवा वारंवार ठणकणे.
- कडक पदार्थ गिळताना सुरुवातीला थोडा त्रास होणे. नंतर या त्रासात वाढ होत जाणे.
- मानेवरील सूज येणे आणि हळूहळू ती वाढत जाते.
डोके व मानेच्या कर्करोग उपचार
योग्य चिकित्सा झाल्यावर या कर्करोगावर शस्त्रक्रिया हा एक प्रमुख उपाय आहे. तसेच रोगाची अवस्था पाहून या कर्करोगाचे उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया, केमोथेरपी, इम्यूनोथेरपी किंवा रेडिएशन थेरेपी हि वापरली जाते. कधी कधी या थेरपींचा एकत्रीत वापरही करण्यात येऊ शकतो.
- शस्त्रक्रिया – या कर्करोगांच्या उपचारापैकी हा एक मुख्य उपचार आहे. जिथे संपूर्ण प्रभावित भाग काढला जातो. कर्करोगाच्या पेशी शस्त्रक्रियाने काढून टाकल्या जातात.
- केमोथेरपी – इम्यूनोथेरपीसह केमोथेरपी कर्करोगाच्या पेशींना मारण्यात मदत करते. काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेपूर्वी केमोथेरपी दिली जाते आणि नंतर कर्करोगाच्या पेशी शस्त्रक्रिया करून काढून टाकल्या जातात..
- रेडिएशन थेरपी – रेडिएशन थेरपीमध्ये कर्करोगाच्या पेशींना मारण्यासाठी रेडिएशन वापरले जाते.
डोके व मानेच्या कर्करोगाची कोणतीही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करणे गरजेचे आहे. सध्या यावरील उपचारपद्धती हमखास यश देणारी आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. योग्य डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास रुग्ण लवकर बरे होतात
कॅन्सर तज्ज्ञ आणि कॅन्सर सर्जन(Oncologists and Cancer Surgeons):
डॉ. आशिष पोखरकर हे पुण्यातील कॅन्सर तज्ज्ञ आणि कॅन्सर सर्जन आहेत. त्यांनी बी.जे. मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल, पुणे येथून पदवी पूर्ण केली. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, त्यांनी कर्करोग शस्त्रक्रियेतील सुपर स्पेशलायझेशन पूर्ण केले. मुंबईतील प्रख्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटल, येथून एमसीएच पदवी प्राप्त केली. एमसीएच उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून मिनिमली इनवेसिव्ह आणि रोबोटिक ऑन्को सर्जरीमध्ये फेलोशिपसाठी निवड झाली. सध्या ते मेडी पॉइंट हॉस्पिटल, औंध येथे सल्लागार सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून काम करतात. तसेच त्यांचे मोशी,पुणे स्वतःचे प्रथमेश कॅन्सर क्लिनिक देखील आहे.