कोलोरेक्टल कर्करोग: जोखीम घटक आणि प्रतिबंध (Colorectal Cancer: Risk Factors And Prevention In Marathi)

कोलोरेक्टल-कर्करोग-जोखीम-घटक-आणि-प्रतिबंध.

आपण सर्वांनी रक्त, स्तन(breast), गर्भाशय आणि तोंडाचा कर्करोगाबद्दल ऐकले आहे. कोलोरेक्टल कॅन्सर हा देखील एक प्रकारचा कर्करोग आहे. कोलोरेक्टल कर्करोगाबाबत लोकांमध्ये पुरेशी जागरुकता नाही. परंतु, इतर कर्करोगांप्रमाणेच, हे खूप जीवघेणे असू शकते. कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे मोठे आतडे व गुदाशयाचा कर्करोग. हा जगभरात सर्वाधिक प्रमाणात आढळणा-या कर्करोगांपैकी तिस-या क्रमांकाचा आजार आहे. भारतामध्ये दरवर्षी कोलोरेक्टल कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण खूप वाढते आहे.

हा आकडा वर्षाकाठी २० टक्के इतक्या भयावह वेगाने वाढत आहे. पुरुष व स्त्रियांमध्ये कोलोरेक्टल कर्करोगाचे प्रमाण हे जवळजवळ सारखे आहे.या कर्करोगाचा लवकर निदान झाल्यास उपचार होऊ शकतात.

कोलोरेक्टल कर्करोग जोखीम घटक कोणते आहेत (What are the risk factors for colorectal cancer in marathi)?

  • कोलोरेक्टल कर्करोग हा आतड्यांमध्ये जळजळ आणि हे लठ्ठ लोकांमध्ये जास्त आढळतो. गुदाशयात रक्तस्त्राव, पोटदुखी, वारंवार वायू, काळा किंवा गडद रंगाचा मल ,अशक्तपणा ही कोलोरेक्टल कर्करोगाची लक्षणे आहेत.
  • कौटुंबिक इतिहास, लाल मांसाचे सेवन आणि कमी फायबरयुक्त पदार्थ खाणे यामुळे धोका वाढू शकतो. कोलोरेक्टल कर्करोगाच्या लक्षणांमध्ये बद्धकोष्ठता, आतड्यांमधून रक्तस्त्राव, गुदाशयात रक्तस्त्राव, ओटीपोटात दुखणे, वारंवार वायू, काळा किंवा गडद रंगाचा मल आणि अशक्तपणा यांचा समावेश होतो
  • कोलोरेक्टल कर्करोग तरुणांमध्ये होऊ शकतो, परंतु प्रौढांमध्ये तो अधिक दिसतो. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका जास्त असतो.
  • कुटुंबातील एखाद्याला कोलोरेक्टल कर्करोग असल्यास, तो इतर लोकांमध्ये पसरू शकतो.

कोलोरेक्टल कर्करोग प्रतिबंध कसा करावा(How to prevent colorectal cancer in marathi)?

पौष्टिक आहार घ्या – आरोग्य चांगले असेल तर कोणताही रोग तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. पण आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी शरीराला सकस आहाराची गरज असते. यासाठी तुमच्या रोजच्या आहारात ताजी फळे, भाज्या, शेंगा, कडधान्ये आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश करा. लाल मांस, प्रक्रिया केलेले अन्न, मिठाई, कार्बोनेटेड पेये आणि जंक फूड टाळा. मैद्या युक्त पदार्थ सारखे खाल्ल्यानेही हा त्रास वाढतो. जास्तीत जास्त फायबर असेलेला आहार घ्या. त्यामुळे बद्धकोष्ठता टाळली जाते,

व्यायामाचा अभाव – कामात व्यस्त असल्यामुळे व्यायामाला वेळ न देणे चुकीचे आहे. शारीरिक हालचालींचा अभाव कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका वाढवू शकतो. त्यामुळे दररोज अर्धा तास व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यासाठी सायकल चालवणे, पोहणे, चालणे, जॉगिंग, योगासने, एरोबिक्स, एखादा आवडता खेळ असे व्यायाम करावेत. याशिवाय तणावापासून दूर राहण्यासाठी नियमितपणे ध्यान करा. योगासने करा.

याशिवाय नियमित तपासणी, काही लक्षणे दिसल्यास ताबडतोब तज्ञ डॉक्टरांना भेटणे महत्वाचे ठरते. कोलोरेक्टल कर्करोगाचे योग्य निदान झाल्यास त्यावर उपचार केले तर कोणतही गंभीर परिणाम होत नाहीत

कॅन्सर तज्ज्ञ आणि कॅन्सर सर्जन(Oncologists and Cancer Surgeons):

डॉ. आशिष पोखरकर हे पुण्यातील कॅन्सर तज्ज्ञ आणि कॅन्सर सर्जन आहेत. त्यांनी बी.जे. मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल, पुणे येथून पदवी पूर्ण केली. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, त्यांनी कर्करोग शस्त्रक्रियेतील सुपर स्पेशलायझेशन पूर्ण केले. मुंबईतील प्रख्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटल, येथून एमसीएच पदवी प्राप्त केली. एमसीएच उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून मिनिमली इनवेसिव्ह आणि रोबोटिक ऑन्को सर्जरीमध्ये फेलोशिपसाठी निवड झाली. सध्या ते मेडी पॉइंट हॉस्पिटल, औंध येथे सल्लागार सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून काम करतात. तसेच त्यांचे मोशी,पुणे स्वतःचे प्रथमेश कॅन्सर क्लिनिक देखील आहे.