केमोथेरपी म्हणजे काय( What Is Chemotherapy In Marathi)?

केमोथेरपी म्हणजे काय( What Is Chemotherapy In Marathi)?

कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला केमोथेरपी(Chemotherapy) हि उपचार म्हणून दिली जाते..कारण केमोथेरपी म्हणजे कॅन्सरच्या विरोधात वापरली जाणारी औषध. ही औषधे गोळ्या किंवा मग इंजेक्शनने आपल्या शरीरात दिली जातात.केमोथेरपी (Chemotherapy)म्हणजेच रेडिएशन. केमोथेरपीलाच किमो (Chemo)असेही म्हणतात. रुग्णाला झालेला कर्करोगाचा प्रकार, रुग्णाचे वय, आरोग्य हे सर्व लक्षात घेऊन तज्ज्ञ डॉक्टर ‘किमो’ कधी, कोणती व किती द्यायची ते ठरवितात. त्यामुळे प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला वेगळा असू शकतो.

कॅन्सर रुग्णाला केमोथेरपीचा (Chemotherapy)किती फायदा होतो?

 कॅन्सर रुग्णाच्या बाबतीत सांगायचे झाले तर कॅन्सर कुठल्या प्रकारचा आहे हे रक्त तपासणी केल्यावरच आपल्याला कळते. शरीराच्या ज्या भागात कॅन्सर झालाय तिथे गाठी तयार होतात. त्या गाठीचे सॅम्पल घेऊन मग त्याची चाचणी केली जाते. अशा प्रकारे निदान केले जाते. अशा वेळी निदान झाल्यावरच कॅन्सर कुठल्या स्टेजचा आहे हे कळते आणि मगच केमोथेरपीसाठी डॉक्टर आपल्याला सांगतात.

 खरे तर कॅन्सर रुग्णासाठी केमोथेरपी हे एक वरदानच आहे.केमोथेरपी कॅन्सर रुग्णांसाठी संजीवनी देणारी असते. कारण किमोथेरपीमुळे कर्करोग पेशींची शरीरातील वाढ खुंटते आणि कर्करोग आटोक्यात राहतो. शिवाय रुग्ण पूर्णपणे बरा होतो.अशी बरीच उदाहरणे  आहेत.ज्यांनी कॅन्सरवर पूर्णपणे मात केली आहे आणि आता छान आयुष्य जगत आहेत. कितीतरी मोठमोठे  खेळाडू आणि सामान्य माणसे यातून वाचली आहेत.

  किमोथेरपी ( chemotherapy) ही एक महत्त्वाची थेरपी आहे.मात्र ही काही साधी सोपी गोष्ट नाही. कारण ह्याचे काही परिणाम आपल्या शरीरावर  बाह्य स्वरुपात दिसू लागतात. शिवाय शरीरात देखील. ह्याचे परिणाम जाणवतात.झपाट्याने वाढणाऱ्या तसेच विघटित होणाऱ्या पेशींवर आक्रमण करण्यासाठी केमोथेरपीचा उपयोग होत असल्याने, त्याजवळच्या निरोगी पेशींनाही बाधा पोहोचते.केमोथेरपीदरम्यान केसगळतीचा त्रास होतो., त्वचा कोरडी पडते यासारखे परिणाम दिसतात. केमोथेरपीचे असे वेगवेगळे परिणाम होत असले तरी ते तात्पुरते असतात.

 तज्ज्ञ डॉक्टरांनी ठरविलेली केमोथेरपीची चक्रे(Cycles of chemotherapy) पूर्ण करणे आवश्यक असते .हे परिणाम रोखण्यासाठीही औषधं आहेत. मात्र ती घेत असताना आपल्याला काही योग्य आहार घ्यावा लागतो. हलका व्यायाम करावा लागतो. आपले मन रमेल असा छंद जोपासावा लागतो. जेणेकरून आपल्याला मानसिक त्रास होत नाही. कारण, शरीरापेक्षा मनाने आपण खूप खचून जातो.

शिवाय  लोकांमध्ये किमोथेरपी बद्दल बरेच गैरसमज सुद्धा आहेत. पण हेही तितकच खरे आहे कि किमोथेरपी पुढच्या स्टेजच्या रुग्णाला द्यावीच लागते.  कॅन्सरवर असलेल्या  उपचारांमुळे आता भारतात कॅन्सरमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. योग्य वेळेत उपचार झाल्यास कॅन्सरवर मात देता येते.

कॅन्सर तज्ज्ञ आणि कॅन्सर सर्जन(Oncologists and Cancer Surgeons):

डॉ. आशिष पोखरकर हे पुण्यातील कॅन्सर तज्ज्ञ आणि कॅन्सर सर्जन आहेत. त्यांनी बी.जे. मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल, पुणे येथून पदवी पूर्ण केली. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, त्यांनी कर्करोग शस्त्रक्रियेतील सुपर स्पेशलायझेशन पूर्ण केले. मुंबईतील प्रख्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटल, येथून एमसीएच पदवी प्राप्त केली. एमसीएच उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून मिनिमली इनवेसिव्ह आणि रोबोटिक ऑन्को सर्जरीमध्ये फेलोशिपसाठी निवड झाली. सध्या ते मेडी पॉइंट हॉस्पिटल, औंध येथे सल्लागार सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून काम करतात. तसेच त्यांचे मोशी, पुणे स्वतःचे प्रथमेश कॅन्सर क्लिनिक देखील आहे.