किडनी कॅन्सरचे लक्षणे, उपचार व शस्त्रक्रिया ( Kidney Cancer in Marathi )

किडनी कॅन्सर लक्षणे, उपचार व शस्त्रक्रिया - Dr. Ashish Pokharkar

किडनी कॅन्सर

आज जगभरात नाना प्रकारच्या रोगांनी जन्म घेतला आहे त्यापैकी एक म्हणजे किडनी कॅन्सर ज्याला रीनल कॅन्सर ही म्हणतात. हा रोग आज वाढत्या प्रमाणावर आहे त्याचे कारण म्हणजे हा वयस्क व्यक्ती बरोबर लहान वय असलेल्या मुलांमध्येही आढळून येतो. अमेरिकन कॅन्सर सोसायटी नुसार किडनी कॅन्सर १० कॅन्सर मध्ये कॉमन आहे. त्यांच्या मते हा रोग ४८ पुरुषांत १ पुरुषाला व ८३ महिलेत १ महिलेला प्रभावित करतो. परंतु युरीन मधून ब्लड येणे हाच याच लक्षण आहे की इतर काही आहे, काय असतो हा? काय त्रास होतो?
किडनी कॅन्सर:-
किडनी कॅन्सर म्हणजे किडनी मध्ये कॅन्सर गाठ निर्माण होवून त्याची वाढ होणे. जेव्हा ही गाठ मोठी होते तेव्हा किडणी चा आकारही वाढतो. जर हा कॅन्सर किडनीच्या बाहेर पडला तर स्नायू, यकृत, मणका आणि रक्तवाहिनीत प्रवेश करू शकतो. आणि त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होण्यास सुरुवात होते. लहान मुलांमध्ये विल्म्स ट्यूमर आणि क्लिअर सेल सार्कोमा हा किडनी कॅन्सर आढळतो. पण जर ही गाठ लहान असताना लक्षणाव्दारे लक्ष्यात घेऊन उपचार केलं तर तिला शरीराच्या बाहेर काढता येत.

किडनी कॅन्सरची लक्षणे:-

अनेक पेशंटमध्ये या रोगाची काहीही लक्षणे आढळत नाही परंतु जसजसं त्याचा प्रभाव वाढतो तसतसं लक्षण तीव्र होत जातात. किडनी कॅन्सरचं प्रमुख लक्षण म्हणजे लघवीतून रक्त पडणे यात त्रास होत नाही पण जर ट्युमर अथवा गाठीत वाढ झाली तर पाठीत किंवा कमरे जवळ वेदना होतात. ताप येतो, घाम सुटतो, रक्तदाब वाढतो व वजन घटण्यास सुरुवात होते.

किडनी कॅन्सरची कारणे:-

खूपदा या रोगाचं कारण हे वय असते, साधारण वयाच्या ६० व्या वर्षा नंतर या रोगाची शक्यता असते. धूम्रपान हाही या रोगास मुख्यंता कारणीभूत ठरतो. अनेकदा अतिरिक्त वजन, दीर्घ काळापासून डायलिसिसवर असणे, नेहमी रक्तदाब जास्त असणे यामुळेही रीनल कॅन्सरचे चांसेस वाढतात.

किडनी कॅन्सर चाचण्या:-

किडनी कॅन्सरचे प्रमुख चाचण्या म्हणजे अल्ट्रासाऊंड, एक्स-रे, सीटी स्कॅन आणि एम.आर.आय. पण खूपदा डॉक्टर ट्युमारला चांगल्याने समजण्यासाठी पर्क्यूटेनियस बायोप्सी करतात.

उपचार व शस्त्रक्रिया:-

किडनी कॅन्सरचे उपचार तो किती प्रभवशाली आहे यावरून ठेवले जाते. जर कॅन्सर लवकर सापडलं तर रेडिएशनच्या माध्यमातून इलाज केला जातो. अन्यथा गाठ अथवा मूत्रपिंड काढून पेशंटची या रोगतून सुटका केली जाते. कधीकधी डॉक्टर मेडिकेशन थेरेपी करतात जेणे करून कॅन्सर सेल खत्म करण्यास मदत होते.

जर आपल्याला एखाद लक्षण आढळलं तर त्यास दुर्लक्षित करण्या ऐवजी डॉक्टरांचं सल्ला घ्यावे. आणि जर रीनल कॅन्सर असेल तर नियमित तपासणी व डॉक्टरांना भेट देणे गरजेचे असते.

कॅन्सर तज्ज्ञ आणि कॅन्सर सर्जन(Oncologists and Cancer Surgeons):

डॉ. आशिष पोखरकर हे पुण्यातील कॅन्सर तज्ज्ञ आणि कॅन्सर सर्जन आहेत. त्यांनी बी.जे. मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल, पुणे येथून पदवी पूर्ण केली. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, त्यांनी कर्करोग शस्त्रक्रियेतील सुपर स्पेशलायझेशन पूर्ण केले. मुंबईतील प्रख्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटल, येथून एमसीएच पदवी प्राप्त केली. एमसीएच उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून मिनिमली इनवेसिव्ह आणि रोबोटिक ऑन्को सर्जरीमध्ये फेलोशिपसाठी निवड झाली. सध्या ते मेडी पॉइंट हॉस्पिटल, औंध येथे सल्लागार सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून काम करतात. तसेच त्यांचे मोशी, पुणे स्वतःचे प्रथमेश कॅन्सर क्लिनिक देखील आहे.